राज्यात एकूण १,०३,४८६ ॲक्टिव्ह रुग्ण

सोमवार, 19 जुलै 2021 (08:15 IST)
राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे एकीकडे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत.शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. मागील काही दिवसांपासून दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. राज्यात रविवारी ९ हजार नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १८० रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ५ हजार ७५६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ५९,८०,३५० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ ५४,८१,२५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ १४,१९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६७,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार ६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात  एकूण १,०३,४८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती