राज्यात शुक्रवारी ९६३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२७,८३८ झाली आहे. राज्यात ९७२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण ६४,७१,७६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६५ टक्के एवढे झाले आहे. याशिवाय, २४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत १४०६९२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.राज्यात एकूण ११,७३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.