राज्यात 51,751 नवे कोरोना रुग्ण, 52,312 जणांना डिस्चार्ज

बुधवार, 14 एप्रिल 2021 (07:58 IST)
राज्यात कोरोनाचा वाढता आलेख काही प्रमाणात खाली आला असून, मंगळवारी दिवसभरात 51 हजार 751 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 52 हजार 312 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 34 लाख 58 हजार 996 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 28 लाख 34 हजार 473 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.94 टक्के एवढं झाले आहे.
 
राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 नव्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 58 हजार 245 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.68 टक्के एवढा आहे.
 
सध्या राज्यात 32 लाख 75 हजार 224 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 29 हजार 399 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 22 हजार 393 नमूने तपासण्यात आले आहेत.
 
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 15 ते 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती