इस्लामपूर येथे दोन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे चारही जण हजहून आले होते. दोन्ही कुटुंबाला घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले होते तसेच नंतर प्रशासानाने त्यांच्या कुटुंबाशी निगडीत 39 लोकांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन केले होते. यापैकी 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे पाचही जण एकाच कुटुंबातील आहे.