राज्यात गुरुवारी ४३ हजार १८३ नवीन करोनाबाधित वाढले असून, २४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील मृत्यू दर १.९२ टक्के आहे. तर, राज्यात एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, ३२ हजार ६४१ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २४,३३,३६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.