राज्यात २०९१ नवे कोरोना रुग्ण, संख्या ५४ हजाराच्या पुढे

बुधवार, 27 मे 2020 (07:40 IST)
महाराष्ट्रात २०९१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ९७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. करोनाग्रस्तांची महाराष्ट्रातली संख्या ५४ हजार ७५८ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३६ हजार ४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ११६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ हजार ९५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. 
 
राज्यात ९७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३९ मृ्त्यू मुंबईत, ठाण्यात १५, कल्याण डोंबिवलीत १०, पुण्यात ८, सोलापुरात ७, औरंगाबादमध्ये ५, मीरा भाईंदरमध्ये ५, मालेगावमध्ये ३, उल्हासनगरमध्ये ३ आणि नागपुरात १ मृत्यूची नोंद झाली आहे. 
 
झालेल्या ९७ मृ्त्यूंमध्ये ६३ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३७ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरच्या वयाचे होते. तर ४९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. ११ जण ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते. ९७ पैकी ६५ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७९२ इतकी झाली आहे. नोंदवण्यात आलेल्या एकूण मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांमधले आहेत. तर उर्वरित मृत्यू हे १७ ते २३ एप्रिल ते २३ मे या कालावधीतले आहेत.  पाठवण्यात आलेल्या ३ लाख ९० हजार १७० नमुन्यांपैकी ५४ हजार ७५८ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत इतर निगेटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६७ हजार ६२२ जण होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती