राज्यात 2,876 नवे कोरोना रुग्ण, 2,763 जणांना डिस्चार्ज
महाराष्ट्रात बुधवारी 2 हजार 876 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2 हजार 763 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज घडीला 33 हजार 181 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65 लाख 67 हजार 791 एवढी झाली आहे. त्यापैकी 63 लाख 91 हजार 662 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.32 टक्के एवढा झाला आहे.