देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. रविवारी १० हजार ४४२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ५०४ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. एका दिवसात ४८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५९ लाख ८ हजार ९९२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ५६ लाख ३९ हजार २७१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे एकूण १ लाख ११ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ५५ हजार ५८८ सक्रिय रुग्ण आहेत.