राजकीय अस्थिरतेत तिसरी आघाडी सक्रिय

तिसरी आघाडी, डावे व बसपाच्या नेत्यांनी सर्वसाधारण धोरणनिश्चितीसाठी एकत्र येऊन तिसरी आघाडी आकार घेत असल्याचे संकते दिले आहे. विश्वासमत ठराव व सद्य राजकीय घडामोडींवर त्यांनी विचारमंथन केले.

तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, आसाम गण परिषदेचे ब्रिंदावन गोस्वामी, अजय चौटाला व झारखंडचे बाबुलाल मरांडी या नेत्यांनी पर्यायी आघाडीच्या उभारणीबाबत चाचपणी केली.

डावे व बसपाच्या मायावतींनीही उपस्थिती लावली. सपुआ कोसळल्यास तिसऱ्या आघाडीचा सशक्त पर्याय उभा करण्यासाठी त्यांनी तयारी चालवली आहे. राष्ट्रीय लोकदलाच्या अजित सिंगही आघाडीत सामील झाले.

तिसऱ्या आघाडीच्या पर्यायी सरकारची मोट बांधण्यात ते यशस्वी झाल्यास मायावती या त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार राहतील, असे संकेत मिळत आहेत.

वेबदुनिया वर वाचा