संसदेत विश्वासमत ठराव जिंकून केवळ संपुआ सरकारचाच विजय झालेला नाही. तर देशाला महासत्ता बनविण्यासाठी झटणा-या त्या सर्वसामान्य स्वप्नांचा विजय आहे. आता देश मोठया खंबीरपणे अणूकरार पूर्ण करून जगाच्या नकाशावर एक शक्तीशाली देश म्हणून सामोरा येणार आहे. जगाला याव्दारे खात्री पटली की देशवासीयांना त्यांच्या भल्याची जाणीव आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विश्वासमत ठराव जिंकल्यानंतर दिली.