डाव्यांचा पंतप्रधानांवर खोटारडेपणाचा आरोप

भाषा

सोमवार, 21 जुलै 2008 (18:23 IST)
डाव्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वासमत ठरावावर संसदेत खोटे बोलल्याचा आरोप करून त्यांचे तोकडे भाषण हे विश्वासाची पातळी घसरल्याचे प्रतीक असल्याचे वक्तव्य डाव्यांनी केले आहे.

किमान समान कार्यक्रमाचे पालन न करता सरकारच्या एकट्याने निर्णय घेण्यावरील विश्वास त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाला आहे. दोन पक्षांमध्ये याप्रकरणी सहमती नसताना अणुसहकार्य करार रेटून किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन केल्याचा आरोप माकपचे वरिष्ठ नेते निलोत्पल बसू यांनी केला.

अल्पमतातील सरकार एकट्याने अणुकरार पूर्णत्वास नेऊ शकत नाही. डाव्यांनी किमान समान कार्यक्रमावर सपुआ सरकारला पाठिंबा दिला होता, मात्र त्याचे पालन झाले नाही. परिणामी डाव्यांना समर्थन मागे घ्यावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा