'खासदार लाचप्रकरणाची चौकशी होईल'

एएनआय

मंगळवार, 22 जुलै 2008 (19:34 IST)
समाजवादी पक्षाने कथितरीत्या भाजपच्या तीन खासदारांना लाच दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी स्पष्ट केले. वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या टेप्स लोकसभाध्यक्षांना सोपवण्यात आल्या आहेत.

मात्र टेप्स निर्णायक नसल्याचे वाहिनीने स्पष्ट केले आहे. भाजपच्या खासदारांनी विश्वासमत ठरावावर तटस्थ राहण्यासाठी समाजवादी पक्षाने लाच दिल्याचा आरोप करून सभागृहात नोटांची बंडले दाखवली होती.

सभागृहाच्या कामकाजास परत सुरूवात झाली असून पंतप्रधानांनी चर्चेस उत्तर दिल्यानंतर साडेसात वाजता विश्वासमत ठरावावर मतदान घेण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा