'सरकारचा प्रत्येक निर्णय देशहिताच्या दृष्टिकोनातूनच'

भाषा

सोमवार, 21 जुलै 2008 (15:24 IST)
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारचा प्रत्येक निर्णय देशहिताच्या दृष्टिकोनातून घेण्यात आल्याचे स्पष्ट करून सभागृहास विश्वासमत ठराव मांडला. पंतप्रधानपदाचे जबाबदारी घेतल्यापासून देशहित लक्षात घेऊनच निर्णय घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'सभागृह मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करते', अशा आशयाचा ठराव त्यांनी मांडला. विश्वासमत ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या दोन दिवसांच्या विशेष सत्रास आज सुरूवात झाली.

सरकारचा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर किंमतवाढ व वस्तूंची दरवाढ यासारखे प्रश्न हाताळण्याच्या निर्णायक प्रसंगी ठरावास सामोरे जावे लागत असल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केली.

सरकारचा पाठिंबा काढणार्‍या डाव्यांच्या नेतृत्वाचा आढावा घेताना त्यांनी ज्योती बसु, हरक्रिशनसिंग सुरजित यासारख्या नेत्यांची विद्वत्ता व दूरदृष्टिची आठवण करून आघाडी सरकारचे ते शिल्पकार असल्याचे स्पष्ट केले.

लोकसभेत विश्वासमत ठराव मांडतांना सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय, धोरणात्मक निर्णय देशाचे नागरिक व देशहित लक्षात घेऊनच घेण्यात आल्याबाबत सभागृहास आश्वस्त केले.

वेबदुनिया वर वाचा