महाशक्ती बनण्यासाठी अणुकरार सहाय्यभूत

भाषा

सोमवार, 21 जुलै 2008 (17:29 IST)
अणुसहकार्य करारामुळे देश महाशक्तींच्या रांगेत येणार असून सरकारने संधी दवडता कामा नये, असे मत ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. सी एन राव यांनी व्यक्त केले आहे. राव हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत.

अणुकराराच्या अंमलबजावणीमुळे जगतील महाशक्तींमध्ये समावेश होण्यासाठी स्पर्धात्मक फायदे उपलब्ध होईल. ऊर्जा समस्येच्या सोडवणुकीसोबतच जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा सुधारण्यासाठीही करार उपयुक्त ठरेल.

सद्या अणुऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक संसाधने व इंधनपुरवठा शक्य नसल्यानेच देशातील अणुभट्ट्या क्षमतेच्या फक्त पन्नास टक्के काम करतात. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातच अणुसहकार्य कराराने प्राथमिक रूप घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा