सलग पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरुच आहे. आज सकाळी भारतीय खेळाडू गगन नारंग व इमरान यांनी 50 मीटर रायफल थ्री पॉजिशन गटात भारताला 16 वे सुवर्ण पदक मिळवून दिले.
या सामन्यात या जोडीने 2325 गुण मिळवत नवीन विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
यापूर्वी डोला बॅनर्जी, बोंम्बाल्या देवी व दीपिका कुमारी या तिघींनी भारताला पहिल्यांदाच महिला तिरंदाजीत सुवर्ण पदक मिळवून दिले. या सामन्यात भारताने इंग्लंडचा केवळ एका गुणाने पराभव केला.