दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या व्यवस्था व सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतानाच, भारत यशस्वीरीत्या हे गेम्स पूर्ण करुन दाखवेल असा विश्वास ऑस्ट्रेलियन हॉकी कोच रिक चार्ल्सवर्थ यांनी व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिल्लीत येण्यास कोणतीही हरकत नसून, भारत या गेम्सचे यशस्वी नियोजन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न असला तरी भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याने भिती वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.