ऑस्ट्रेलियन पहेलवानाचे पदक काढले

वेबदुनिया

बुधवार, 6 ऑक्टोबर 2010 (15:54 IST)
ऑस्ट्रेलियन नागरिकांचा भारतीयांप्रती असलेला द्वेष आता कॉमनवेल्थ गेम्समध्येही दिसून आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या हसन फकीरी या पहेलवानाने अंपायरला अश्लिल इशारा केल्याने हसनचे पदक काढून घेण्‍यात आले असून, त्याला नजरबंद करण्‍यात आले आहे.

खेळ संपेपर्यंत त्याला एका खोलीत बंद ठेवण्‍याचे आदेश देण्यात आले असून, या प्रकाराने सार्‍यांनाच धक्का बसला आहे.

आज झालेल्या सामन्यानंतर अनिल कुमारला विजेता घोषीत करण्‍यात आल्याने नाराज हसनने कुमारसोबत हस्तोंदलन करण्‍यासही नकार दिला. इतकेच नाही तर त्याने अंपायच्या दिशेने अश्लिल इशारा केल्यानंतर त्याचे पदक काढून घेण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

हसनच्या कृतीने ऑस्ट्रेलियाचे नाव खराब झाले असून, त्याला मायदेशी परतल्यावर शिक्षा होईल असे आश्वासन ऑस्ट्रेलियन संघाचे प्रमुख स्टीव्ह मॉनगट्टी यांनी दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा