आजही ऑस्ट्रेलियन खेळाडूचा उद्धटपणा

वेबदुनिया

गुरूवार, 7 ऑक्टोबर 2010 (16:12 IST)
ऑस्ट्रेलियन पहेलवान फकीरीने अंपायरला वाकडे दाखवल्याने त्याचे पदक काढून घेण्याचा प्रकार काल घडला होता. आजही सायकलिंगच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियन खेळाडूने मुद्दाम दोघा खेळाडूंना धक्का दिल्याने नाराज सामना अधिकार्‍यांनी या खेळाडूला बाहेर काढले.

क्रिकेटच्या मैदानावरील कांगारुंचा माजोरपणा आता कॉमनवेल्थ गेम्समध्येही दिसून येत आहे. आज ऑस्ट्रेलियाच्या शेन पार्किन्सयाने एका आफ्रिकी तर एका स्कॉटलंडच्या खेळाडूला धक्का दिला. झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागणे तर सोडाच परंतु शेनने सामानाधिकार्‍यांचीच खिल्ली उडवल्याने त्याला या सामन्यातून बाहेर काढण्‍यात आले.

त्याची तक्रार ऑस्ट्रेलियन संघाकडे करण्‍यात आली असून, गेम्समध्ये कांगारुंचा माजोरपणा उघड झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा