हॉकी: भारताकडून इंग्लंडचे पानिपत

वेबदुनिया

बुधवार, 13 ऑक्टोबर 2010 (08:27 IST)
भारतीय हॉकी संघाने कॉमनवेल्थ गेम्स मधील आपली विजयी घोडदौड कायम राखत अत्यंत रोमांचकारी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 5-4 असा पराभव केला.

अत्यंत चुरसीच्या झालेल्या या सामन्यात दोनही संघानी 3-3 गोल केल्यानंतर पेनॉल्टी शूटआऊटच्या माध्यमातून गोल करण्‍याची संधी देण्‍यात आली. यात भारताने बाजी मारली.

पहिल्या हाफ पासूनच भारतीय संघाने आघाडी घेत आक्रमक खेळ केला. पहिल्या हाफमध्ये भारताने एक गोल करत इंग्लंडवर दबाव निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला. परंतु पाहुण्‍या संघाने पहिला हाफ संपण्‍यापूर्वीच काही सेकंद आगोदर गोल करत बरोबरी साधली. यानंदर उभय संघांतर्फे दोन गोल करण्‍यात आले.

पेनॉल्टी शूटआऊटमध्ये सरवनजीत सिंह, विक्रम पिल्ले, संदीप सिंह, अर्जुन हलप्पा व शिवेंद्र सिंह यांनी गोल केले. दुसरीकडे इंग्लंडचा एक गोल भारताचा गोलची शरत छेत्रीने उत्कृष्ट‍रीत्या अडवल्याने भारताला विजय मिळाला.

वेबदुनिया वर वाचा