हॉकी: ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

वेबदुनिया

मंगळवार, 12 ऑक्टोबर 2010 (16:24 IST)
ऑस्ट्रेलियन संघाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज भारत व इंग्लंडदरम्यान सेमीफायनल सामना होणार असून, यात विजेता होणार्‍या संघाला ऑस्ट्रेलियाशी भिडावे लागणार आहे.

आज ऑस्ट्रेलियाने 6-2 असा न्यूझीलंडचा पराभव केला. सुरुवातीपासूनच कांगारु संघाने आक्रमक खेळ करत न्यूझीलंड संघाला गोल करण्‍याची एकही संधी मिळू दिली नव्हती.

सायमन ओचार्ड,ग्लेन टर्नर, जॅन्सन विल्सन, डेस एबोट या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी गोल केले.

वेबदुनिया वर वाचा