राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्धातील सर्व १० सुवर्णपदक भारत जिकेल, असा दावा पेईचिग ऑलिम्पिक कास्पदक विजेता विजेंदरसिह याने केला आहे. क्रीडानगरीत ध्वजारोहणानंतर पत्रकारांशी बोलताना विजेंदरने हा दावा केला. मुष्टियुद्धात भारतीयांनी जोरदार तयारी केली असल्याचे सांगून आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर कामगिरी करताना अधिक फायदा होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.