बिंद्राला पछाडत नारंगचा सुवर्णवेध

वेबदुनिया

बुधवार, 6 ऑक्टोबर 2010 (13:31 IST)
कॉमनवेल्थ गेम्समध्ये अचूक नेम साधत गगन नारंगने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. दुसरे सुवर्णपदक जिंकताने त्याने 10 मीटर रायफल स्पर्धेत आपलाच सहकारी अभिनव बिंद्राला पछाडत सुवर्णपदकावर नाव कोरले.

नारंगला आज दुसरे सुवर्णपदक मिळाले असून, यापूर्वी त्याने व अभिनव बिंद्राने भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले आहे.

आज अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात नारंगने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. 600 पैकी 600 गुण घेत त्याने या स्पर्धेत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

त्याच्या नंतर या स्पर्धेत अभिनव बिंद्रा दुसर्‍या क्रमांकावर राहिल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा