प्रेक्षक नसल्याने खेळाडू निराश!

जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत असले तरी प्रेक्षकांनी या सामन्यांकडे पाठ केल्याने खेळाडू निराश झाले आहेत. काल सलग तिसर्‍या दिवशी प्रेक्षकांची कमतरता सामन्यांमध्ये प्रकर्षाने जाणवत होती.

दिवसभर चालणार्‍या स्पर्धांमध्ये मुश्किलीने काही प्रेक्षक येत असल्याने नियोजन समितीनेही चिंता व्यक्त केली आहे.

दुसरीकडे शंभर व दोनशे मीटर धावण्‍याच्या शर्यतीत किड्यांनी खेळाडूंना जाम हैराण केल्याने खेळाडू नाराज आहेत. विदेशी खेळाडूंनी किड्यांमुळे नाराजी व्यक्त केली असून, अशाने खेळात व्यत्यय येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा