डोपिंग: भारतीय राणी यादव दोषी

वेबदुनिया

बुधवार, 13 ऑक्टोबर 2010 (14:56 IST)
डोपिंगप्रकरणी भारतीय खेळाडूच्या नावाचा खुलासा करण्‍यात आला असून, भारतीय खेळाडू राणी यादव या प्रकरणी दोषी आढळून आली आहे. गेम्समध्ये तिची डोपिंग चाचणी करण्‍यात आली होती. राणीने 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता. यात ती सहाव्या क्रमांकावर होती.

राणीने नँन्ड्रलोन नावाचे औषध घेतल्याचा खुलासा झाला असून, यामुळे भारताचे नाव खराब झाले आहे. राणीचा पहिला चाचणी अहवाल आला असून, आणखी एक बी टेस्टचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. यानंतर तिच्यावर कारवाई होण्‍याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा