कॉमनवेल्थ गेम्सच्या चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून येत आहे. आज सकाळीच भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक तर कुस्तीत रौप्य व तिरंदाजीत एक कांस्य पदक मिळाल्याने भारताची दमदार सुरुवात झाली आहे.
आता भारताच्या खात्यात 26 पदकं झाली असून, यात 12 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
आज नेमबाजीत भारताच्या विजय कुमार व गुरप्रीत सिंह यांनी पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. दुसरीकडे मलेशियन तिरंदाजांना पछाडत भारताच्या भाग्यवती चानू, झानू हंसदा व गगनदीप कौरने कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेत गगनदीपने शानदार खेळ केला.
महिलांच्या कुस्तीत गीताने नायजेरीयन खेळाडू लोविना ओडोहीचा पराभव करत भारताला 55 किलो वजनी गटात रोप्य पदक मिळवून दिले.