चार दिवसांनंतर झाले शेराचे दर्शन!

वेबदुनिया

शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2010 (08:43 IST)
19 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये अखेर चार दिवसांनंतर शेराचे दर्शन झाले आहे. काही कारणांमुळे मागील चार दिवसांपासून गेम्समधून शेरा गायब होता.

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या हॉकी सामन्याच्या मध्यांतरात अचानक शेरा मैदानावर आल्याने सार्‍यांनी एकच जल्लोष केला.

उद्घाटनापासून शेरा गायब असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रसार माध्यमं तसेच प्रेक्षकांची नाराजी पहाता अखेर शेरा मैदानावर दिसल्याने सार्‍यांनीच आनंद व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा