कॉमनवेल्थ गेम्स: भारत तिसर्‍या क्रमांकावर

वेबदुनिया

रविवार, 10 ऑक्टोबर 2010 (09:08 IST)
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पछाडत इंग्लंडने दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारताचा नंबर लागला होता. आता भारत व इंग्लंडमध्ये अटीतटीची लाढाई सुरु असून, भारत तिसर्‍या क्रमांकावर घसरला आहे.

गगन नारंगने सलग चौथे सुवर्ण पदक पटकावत भारताच्या आशा उंचवल्या आहेत. पदक तक्त्यात ऑस्ट्रेलिया सर्वाधीक पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ एकूण 96 पदकं घेत इंग्लंड दुसर्‍या तर 58 पदकांसह भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

भारतापाठोपाठ कॅनडा असून, कॅनडाने 50 पदकांची कमाई केली आहे. इंग्लंड व भारताने प्रत्येकी 24 सुवर्णपदकांची कमाई केली असून, आता अखेरच्या दिवसात भारताला आपल्या खेळाडूंकडून आणखी पदकांची आशा आहे.

वेबदुनिया वर वाचा