कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची कामगिरी

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने चांगली कामगिरी केली असली तरी पहिल्या दिवशी भारतीय चमूनेही अनेक पदकं आपल्या खिशात घातली आहेत.

भारतीय भारोत्तोलक संघाने यात दोन रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली. महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या सोनिया चानूने रोप्य पदक पटकावले. याच गटात भारताच्या संध्या राणीने कांस्य पदक पटकावले.

दुसरीकडे पुरुष गटात सुखेन डे यानेही चमकदार कामगिरी करत भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली. याच गटात भारताच्या एस व्ही राव याने कांस्य पदक पटकावले.

दुसरीकडे टेनिसमध्ये सानिया मिर्झा व लिएंडर पेस या जोडीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर बोपन्नाने युगांडाच्या रॉबर्टचा पराभव करत विजय मिळवला. महिला टेनिसच्या एकेरी गटात रश्मिने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष बॅटमेंटनमध्ये चेतन आनंदने केनियाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

वेबदुनिया वर वाचा