लहान मुलांना जंक फूडपासून दूर ठेवा!

ND
आपल्या जीवनशैलीत खाण्या-पिण्यात मोठा बदल होतो आहे. जंक फूड म्हणजे बाहेर तयार मिळणारे पदार्थ मुलांच्या पोटात जात आहेत. पिझ्झा, बर्गर आणि तत्सम पदार्थ चवीला चांगले लागत असले तरी पोटाला हानीकारक आहेत. शिवाय त्यामुळे आरोग्यावर इतरही परिणाम होत आहेत.

शहरी भागात जास्त
जंक फूडमुळे होणारा विकार म्हणजे दमा. हा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त दिसून येतो आहे. तुलेनेने ग्रामीण वातावरण स्वच्छ आणि तेथे ताजे दूध, फळे व भाज्या मिळतात. शहरांत तसे वातावरण नसते. मुलांना बाहेरचे पदार्थ खायची सवय असते. त्यामुळे शरीर फोफसे होते. ताकद रहात नाही. त्यामुळे चटकन रोगाला बळी पडतात.

ताजी फळे व भाज्या खा!
जेवणात फळे आणि ताज्या भाज्यांचा समावेश केला तर दमा आणि इतर रोगांपासून दूर राहू शकता. म्हणूनच पालक, शिक्षकांनी लहानपणापासूनच मुलांना फळे व भाज्यांचा समावेश जेवणात करण्यासाठी आग्रही राहायला हवे. त्यांची फास्टफूडची सवय मोडून त्यांना चांगले घरगुती पदार्थ खावयास प्रोत्साहित करायला हवे. व्यायाम करण्यासाठीसुद्धा प्रेरीत केले पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा