साहित्य:- छोटे-छोटे कांदे १०, मोहरी डाळ अर्धी वाटी, तेल १ वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, जिरेपूड, धणेपूड, मेथीदाणा प्रत्येकी १ चमचा, कैरी किस अर्धी वाटी, चिमूटभर साखर.
कृती:- कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत. (मसाल्याच्या वांग्यासारखे) कैरीच्या किसात हळद, तिखट, मीठ, मेथी भाजून त्याची पूड, जिरेपूड, धणेपूड, साखर एकत्र करावे. हा मसाला कांद्यात भरावा, गॅसवर पातेल्यात तेल गरम करा, थोडे कोमट असताना मोहरी डाळ घाला. तेल थंड झाल्यावर त्यातच भरलेले कांदे सोडा. कोरड्या बरणीत लोणचे भरून दादरा बांधा.