द्राक्षाचा मुरंबा

ND
साहित्य : 1 किलो द्राक्षे, 1 किलो साखर, 8-10 थेंब गुलाब पाणी, 6-7 केशर काड्या.

कृती : पिकलेले द्राक्ष घेऊन पाण्यात धुवावे व एका स्वच्छ कपड्यावर पसरावे. साखरेचा एक तारी पाक तयार करून त्यात द्राक्ष टाकावे. गुलाबपाण्याची 8-10 थेंब व केशरही त्यात टाकावे. 2-3 उकळी आल्यानंतर खाली उतरवावे व थंड करून भरून ठेवावे. हा मुरंबा पोळी किंवा ब्रेड सोबत मुलांना फारच आवडतो.

वेबदुनिया वर वाचा