जगभरात कॅरेबीयन ट्वेटी-20 लीगच चर्चा आहे. 18 ऑगस्टपासून सुरु होणार्या या लीगमध्ये 33 सामने खेळण्यात येणार आहेत. ही स्पर्धा प्रेक्षक मात्र स्टेडियममध्ये बसून पाहू शकणार नाही. 10 सप्टेंबर रोजी लीगचा अंतिम सामना होईल.
या लीगचा सलामीचा सामना शाहरुख खानच्या ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स यांच्यात होणार आहे.
टॉरुबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 23 तर पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर 10 सामने खेळवण्यात येणार आहेत.