शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर

गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (11:19 IST)
17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय सध्या तरी लांबणीवर गेला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकती हा निर्णय घेतला गेला असून विस्तृत आदेश लवकरच काढले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.
 
बुधवारी रात्री संपन्न झालेल्या या बैठकीत परदेशातील लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती पेडियाट्रिक टास्क फोर्सने दिली. तसंच मुलांसाठी या आजारावर उपयुक्त उपचार आणि औषधे नाहीत शिवाय लहान मुलांना लसीकरण ही सुरु केलेले नाही. अशात शाळा उघडल्या तर अडचण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया सर्व तज्ञ डॉक्टरांनी दिल्यावर तूर्तास हे लांबणीवर गेले आहे.
 
ज्या ठिकाणी रुग्ण संख्या अद्याप कमी होत नाही किंवा नियंत्रणात येत नाही, त्या जिल्ह्यांमध्ये सरसकट शाळा सुरु करता येणार नाही, असे कुटं यांनी स्पष्ट केले. 17 तारेखेपासून शाळा सुरु करण्याचे आदेशावर पद्धतीने सुधारणा करता येईल व निर्णय घतेला जाईल.
 
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू होणार होत्या. राज्य सरकारकडून यासंदर्भातील परिपत्रक  देखील जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या विरोधानंतरही शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याची नियमावली जाहीर करण्यात आली होती. स्टेट टास्क फोर्सने संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही राज्य सरकारकडून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर गेला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती