करिअरची निवड करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मंगळवार, 1 जून 2021 (18:22 IST)
12 वीची परीक्षा अद्याप झाली नाही.तसेच काही विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीत लागलेले आहे.आपल्या करिअरची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासात गुंतलेले आहे.ते कोणत्याही कामात वेळ गमावू इच्छित नाही.ते आपल्या लक्ष्यच्या प्राप्ती मध्ये लागलेले असतात.परंतु काही विध्यार्थी घाईघाईने निर्णय घेतात. 
प्रत्येक कामात किंवा कोणताही निर्णय घेण्यामध्ये घाई करतात त्यांना  तज्ञांचा सल्ला आहे की त्यांनी घाईत कोणतेही पाऊल उचलू नयेत. ते कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यासाठी असोत किंवा कोणत्याही क्षेत्रात पुढे वाढण्यासाठी असो. कारण घाईघाईने उचललेले पाऊल कधीकधी हानिकारक ठरू शकतात.
 
या गोष्टी लक्षात घ्या-
1 करिअर चे क्षेत्र निवडताना किंवा बदलण्यापूर्वी आपल्या क्षमतांची योग्य प्रकारे चाचणी करा.आपली पार्श्वभूमी,आर्थिक स्थिती आणि  शैक्षणिक कामगिरी देखील लक्षात घ्या.
 
2 कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी वेळ आणि परिस्थितीचे मूल्यांकन देखील करा.आपल्या निर्णयानंतर आपल्या जीवनात किंवा परिस्थितीत काय बदल घडतील याचा विचार करा.मगच निर्णय घ्या.
 
3 मनात कोणतीही कोंडी असल्यास, मोठा निर्णय घेण्यापेक्षा लहान पावले उचलणे अधिकच चांगले.
 
4 ज्या क्षेत्रात आपण पुढे जाऊ इच्छित आहात त्या क्षेत्राशी संबंधित लोकांशी बोला आणि त्या क्षेत्राबद्दल विस्तृत माहिती मिळवा.
 
5 कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रथम त्या फिल्डशी संबंधित आवश्यक स्किल विकसित करा.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती