योग्य शिक्षण घ्या
अरोब थेरपी शिकविणार्या अनेक संस्था ब्रिटनमध्ये आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ होलिस्टीक अरोमा थेरपी ही त्यापैकीच एक. रोपांचे घटक, शरीरशास्त्र, व्यावसाय अभ्यास, उपचारात्मक नातेसंबंध, संशोधन, केस स्टडी या विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. रुग्णांमधील समस्या, रोपांचे ज्ञान व जुन्या माहितीचे संकलन हे कौशल्य तुम्हाला विकसित करावे लागतील.
कुठे काम कराल
अरोमा थेरपिस्ट हे सहसा पर्यायी वैद्यकीय उपचार करणार्या क्लिनिकमध्ये काम करतात. रेकी आणि अॅक्युपंक्चर सारखे उपचार होणार्या क्लिनिकमध्ये यांचे काम असते. तुम्ही घरुन अथवा रुग्णांच्या घरी जाऊनदेखील प्रॅक्टीस करू शकता. मात्र या क्षेत्रात चांगल्या मिळकतीसाठी पर्यायी वैद्यकीय उपचार केंद्रामध्ये काम करणे सर्वोत्तम.