हवामानशास्त्र एक उत्तम करियर

ND
21 व्या शतकात हवामानशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. केवळ शेतीसाठी हवामानाची माहिती देण्यापर्यंत हे शास्त्र मर्यादित राहिले नाही, तर सुनामीचा धोका, विमान उड्डाण, जहाजांचे परिवहन आणि खेळाच्या मैदानापर्यंत हवामानशास्त्राचा वापर होवू लागला आहे. आधुनिक उपग्रह तंत्रज्ञानामुळे हवामानशास्त्रातही क्रांतिकारक बदल झाले आहेत. यामुळे शासकीय कार्यालये, हवामान प्रयोगशाळा, अंतराळ विभाग, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर हवामानशास्त्राच्या शिक्षणानंतर रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला हवा, ढग, समुद्र, पाऊस यांच्या अभ्यासात आवड असेल तर हवामानशास्त्र एक उत्तम करियर तुमच्यासाठी ठरू शकेल.

बहुआयामी करिय
हवामानशास्त्र बहुआयामी करियर आहे. या क्षेत्रात आपल्या आवडीनुसार संशोधन म्हणजेच ऑपरेसन-रिसर्च किंवा ऍप्लिकेशनच्या क्षेत्रात करियर करता येईल. ऑपरेसन अंतर्गत हवामान उपग्रह, रडार, रिमोट सेंसर तसेच एयर प्रेशर, तापमान, पर्यावरणासंदर्भातील माहिती एकत्र करून हवामानाची भविष्यवाणी करता येते. ही भविष्यवाणी समुद्रात येणाऱ्या वादळाबाबतची माहिती मासेमारी करणारे तसेच जहाजांना दिली जाते. त्यानुसार त्यांच्या कामकाजांची रूपरेषा ठरते. या क्षेत्रात करियर बनविण्यासाठी क्लाइमेटोलॉजी, हाइड्रोमेट्रोलॉजी, मेरीनं मीट्रिओलॉजी तथा एविएशन मीट्रिओलॉजीमध्ये विशेष ज्ञान मिळविणे आवश्यक असते. या संदर्भातील संशोधनासाठी हवामान विज्ञानात चांगल्या संधी आहेत.

  हवामान विभागाच्या प्रयोगशाळा एकांताच्या ठिकाणी असतात. अ‍ॅंटारटिकासारख्या विजनवासातही प्रयोगशाळा असतात. यामुळे एकांत स्थानी राहण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी 10 ते 5 अशी वेळ निर्धारित नसते.      
हवामानाची माहिती घेऊनच उपग्रह अंतराळात पाठविले जातात. शेतीसाठी हवामानाची माहिती उपयुक्त ठरते. खेळासंदर्भातही हवामानाची माहिती घेऊनच सामन्यांचे नियोजन केले जाते. हवामान शास्त्रातले तज्ज्ञ वातावरणातील हवा, तापमान, आद्रता यांच्या माहितीचे विश्लेषण करून हवामानाचा अंदाज व्यक्त करतात.

हवामान शास्त्राचा अ‍ॅप्लिकेसन क्षेत्रात वातावरणाचे संरचनात्मक अवयव त्याचा प्रभाव याचा अभ्यास करून एकंदरीत हवामानाचा अहवाल तयार केला जातो. हा अहवाल केवळ सरकारी कार्यालयांनाच नव्हे तर दूरचित्रवाणी वाहिन्या, समुद्रात मासेमारी करणे व जहाजांसाठी उपयुक्त ठरतो.

हवामान विज्ञानातील संध
औद्योगीकरणाच्या या युगात हवामान शास्त्राचे महत्त्वही वाढले आहे. या क्षेत्रात इंडस्ट्रियल मीट्रिओलॉजिस्ट अर्थात औद्योगिक हवामान विज्ञानामध्ये आकर्षक करियर करता येईल. ग्लोबल वार्मिंग आणि पर्यावरणातील प्रदूषणाबाबत आता जागरूकता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. ज्यात हवामान शास्त्राचे महत्त्व सर्वाधिक आहे. यामुळे हवामानशास्त्र एक उत्तम करियर होवू शकते.

कृषी और पर्यावरणाच्या क्षेत्रातही चांगल्या संधी उपलब्ध आहेत. स्पेशलाइजेशनमुळे हवामान भविष्यवक्ताच्या रूपात रोजगारच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. देशातील विविध भागात असलेल्या विज्ञान कार्यालय आणि प्रयोगशाळांमध्ये अतिरिक्त सिविल अ‍ॅविएशन, शिपिंग तसेच सैन्यात हवामान सल्लागाराचे पद उपलब्ध आहे.

स्पर्धा परीक्षाद्वारे नागपूर, चेन्नई, कोलकाता और नवी दिल्ली येथील हवामान विभागात भर्तीसाठी परीक्षा घेतली जाते. ज्यात भौतिकशास्त्र विषय घेऊन पदवी घेणारे विद्यार्थी पात्र ठरतात. या परीक्षेत भौतिकशास्त्र, गणिताचा एक-एक पेपर असतो. दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव असतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना हवामान विभागाद्वारे प्रशिक्षण देवून नियुक्ती केली जाते.

हवामान शास्त्रात करीयर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये काही खास गुण असणे आवश्यक आहे. हवामान विभागाच्या प्रयोगशाळा एकांताच्या ठिकाणी असतात. अ‍ॅंटारटिकासारख्या विजनवासातही प्रयोगशाळा असतात. यामुळे एकांत स्थानी राहण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी 10 ते 5 अशी वेळ निर्धारित नसते. अनेक तास काम काहीच नसते तर अनेक वेळा 24 तास काम असते. यासाठी मोठे धैर्य आवश्यक असते. आपत्कालीन परिस्थिती या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर दबाव असतो. या क्षेत्रात टीमवर्कमध्ये काम करणे अपेक्षित असते. यामुळे हे काम आव्हानापेक्षा कमी नाही. यामुळे ज्यांना आव्हान आणि साहसाची आवड आहे, अशांनीच या क्षेत्राची निवड करियर म्हणून करावी.

योग्यता काय हवी?
हवामान शास्त्राच्या ऑपरेसन-रिसर्च और अ‍ॅप्लिकेसनच्या क्षेत्रात प्रवेशासाठी कमीत कमी हवामान विज्ञान किंवा पर्यावरण विज्ञान शाखेची पदवी आवश्यक आहे. तसेच पीसीएम हे विषय आवश्यक आहे.

हवामान शास्त्राचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था:
- भारतीय विज्ञान संस्थान, बेंगळूरू
- आईआईटी खडगपूर
- पंजाबी विद्यापीठ, पटीयाला
- आंध्रा युनिव्हर्सिटी, विशाखापट्टनम
- मणिपूर युनिव्हर्सिटी, इंफाल
- देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर
- अरतियार विश्वविद्यालय कोयंबतूर
- कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सस अ‍ॅड टेक्नोलॉजी
- एमएस युनिव्हर्सिटी ऑफ बडौदा, बडौदा
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
- पुणे विद्यापीठ, पुणे
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

वेबदुनिया वर वाचा