शिक्षणाचे माहेरघर, 'पुणे विद्यापीठ'

रविवार, 29 जून 2008 (14:45 IST)
'विद्यापीठ म्हणजे मानवता आणि सहनशीलता या मानवी विचारांचा चमत्कार व सत्याचा शोध आहे. मानवी कल्याणासाठी विद्यापीठाची स्थापना झाली असून विद्यापीठाने अशाच पद्धतीने प्रगती केली तर आपल्या देशाचे व देशातील नागरिकांचे कल्याण होईल' - पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित नेहरू यांचे हे वाक्य पुणे विद्यापीठाचे तत्त्व आणि सिद्धांत यांना तंतोतंत मिळते जुळते आहे. 1948 मध्ये स्थापन झालेले पुणे विद्यापीठ हे शिक्षणाचे एक प्रमुख केंदबिंदू म्हणून नावलौकीक आहे. पुणे शहराच्या उत्तर-पश्चिम भागात सुमारे 400 एकर परिसरात पुणे विद्यापीठ स्थित आहे.

विद्यापीठातील प्रसन्न वातावरण व अत्याधुनिक सुविधा ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने पोषक असून तेथे हजारो विद्यार्थी विज्ञान, कला व वाणिज्य तसेच इतर भाषांमध्ये शिक्षण घेत आहेत. विद्यापीठात 40 विभाग स्वतंत्ररीत्या कार्यरत असून त्यातून विद्यार्थ्यांसाठी विस्तृत शैक्षणिक मालिका तयार केली आहे.

10 फेब्रुवारी 1948 रोजी मुंबई विधानसभेने पुणे विद्यापीठ अधिनियमांतर्गत मान्यता दिली व प्रथम कुलगुरू पदाचा पदभार डॉ. एम. आर. जयकर यांनी स्वीकारला. माजी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री बी. जी. खेर यांनी विद्यापीठ परिसर अधिक सुंदर दिसावा यासाठी मोलाचे सहकार्य केले. 1950 मध्ये विद्यापीठासाठी 411 एकर भूखंड देण्यात येऊन सुरुवातीस पश्चिम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांचे क्षेत्र बहाल केले.

मात्र,, कोल्हापुरात 1964 मध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन झाल्याने पुणे विद्यापीठाचे क्षेत्र केवळ पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यापर्यंतच सीमित राहिले. त्यानंतर ऑगस्ट 1990 मध्ये जळगाव येथे स्थापन झालेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी जळगाव व धुळे ही दोन जिल्हे जोडण्यात आली.

1949 च्या काळात पुणे विद्यापीठाशी केवळ 18 महाविद्यालय संलग्न होते व त्यात 8000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. नंतरच्या काळात महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढत गेली व 1994-95 दरम्यान पुणे विद्यापीठात 41 पदवोत्तर अभ्यास विभाग सुरू झाले. 2008 मध्ये 118 महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने सध्या 1,70,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

पुणे विद्यापीठाच्या मध्यातून 70 नवीन शिक्षण संस्थांना मान्यता दिली आहे. त्यात नॅशनल केमिकल लॅब्रोटेरीज (एनसीएल), एमएसीएस, सीडब्ल्यू पीआरएस, एनआईवी, गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अंड इकॉनॉमिक्स अशी अनेक अभ्यास शाखा समाविष्ट आहे.

वेबदुनिया वर वाचा