इंटिरियर डिझाइनचे फॅड आता मेट्रो सिटीकडून छोट्या शहरांपर्यंत पोहचले आहे. हॉटेल, ऑफिस, क्लब, बॅक, हॉस्पिटल, शॉपिंग मॉलसह आता राहत्या घराच्या इंटिरियर डेकोरेशनसाठी इंटिरियर डिझाइनर्सची मदत घेतली जात आहे. ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही कंपन्या इंटिरियर डिझायनर्सच्या मदतीने सेवा देताना दिसत आहेत. अलिकडच्या काळात इंटिरियर डिझायनिंगकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आहे. सुशिक्षित तरूणांसाठी त्यात खूप संधी उपलब्ध होत आहे. इंटिरियर डिझायनर्स म्हणून एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करता येऊ शकते तसेच स्वत:चा व्यवसायही थाटता येऊ शकतो.
भारतात मल्टीनॅशनल कंपन्याचा झपाट्याने विस्तार वाढत आहे. तुलनेत इंटिरियर डिझायनर्सची संख्या कमी आहे. भविष्यात इंटीरियर डिझायनर्सची मागणी वाढण्याची शक्यता आहे. 12 वी उत्तीर्ण केल्यानंतर ऑल इंडिया कॉमन टेस्टच्या माध्यमातून डिझाइन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या डिप्लोमाला प्रवेश घेता येतो. काही संस्थांमधून घर बसल्या हा कोर्स पूर्ण करता येतो.
इंटीरियर डिझायनर्स अभ्यासक्रम शिकवणार्या संस्था- 1. डिझाइन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया. 2. स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर, नवी दिल्ली. 3. वास्तुकला अकादमी, स्कूल ऑफ आर्किटेक्चर अॅण्ड इंटीरियर डिझाइनिंग, दिल्ली. 4. सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई. 5. स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर, जेएनटीयू, हैदराबाद.