केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पियुष गोयल यांनी छोट्या शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. सामान्य वर्गासाठीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ३६,६२६.९० च्या स्तरावर पोहोचला. तर निफ्टीमध्येही १३० अंकांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प मांडण्याआधी शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०६.८८ अंकांनी वधारून ३६,३६३.५७ वर जाऊन पोहचला. याचवेळी निफ्टीदेखील ३३.५० अंकांनी वधारलेला दिसून आला.