आज रेल्वे अर्थसंकल्प

वेबदुनिया

बुधवार, 24 फेब्रुवारी 2010 (09:37 IST)
रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी आज रेल्वे अर्थ संकल्प सादर करणार आहेत. रेल्वे भाड्यात कोणतेही वाढ न करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. माल भाड्यात मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बजेटमध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतची 'पीस एक्सप्रेस' तसेच संस्कृती दर्शनासाठी कल्चर एक्सप्रेस सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. रेल्वे अर्थसंकल्पाकडून सामान्य नागरिकांना अपेक्षा असून, हे बजेट सामान्य जनतेचेच असेल असे ममतांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा