वर्ष 2007 मध्ये सुरू झालेल्या जागतिक आर्थिक मंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरीही देशात 2007-08 मध्ये 32.4 अब्ज डॉलरची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) करण्यात आली असल्याची माहिती प्रणव मुखर्जी यांनी दिली आहे.
संसदेत हंगामी अर्थसंकल्प सादर करताना ते म्हणाले, की सरकारने ऑगस्ट 2008 ते जानेवारी 2009 दरम्यान 37 पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 70 हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
एप्रिल ते डिसेंबर 2008 दरम्यान 23.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. हीच गुंतवणूक 2007 च्या तुलनेत 45 टक्के अधिक आहे.