रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात दहा नवे गरीब रथ व ५३ नव्या गाड्यांची घोषणा केली. याशिवाय सोळा गाड्यांचा विस्तार करताना अकरा गाड्यांच्या फेर्याही वाढविण्यात येणार आहे.
काही नव्या गाड्या *नवी दिल्ली- जम्मू तावी गाडी आता रोज *साल्ससा अमृतसर गरीब रथ आठवड्यातून तीनदा *बागलकोटा-जसवंतपूर गाडी रोज *कुर्ला हावडा गाडी आठवड्यातून दोनदा *मुंबई ते भुवनेश्वरदरम्यान आठवड्यातून दोन वेळा नवी गाडी *पुणे-दिल्ली दरम्यान राष्ट्रकूल स्पर्धांसाठी ऑक्टोबरमध्ये विशेष गाडी *मधुरा- लखनौ एक्सप्रेस पाटण्यापर्यंत जाणार *वाराणसी- रांची गाडी रूरकेलामार्फत संभलपूरपर्यंत जाणार *बंगळूर कोईमतूर गाडी एर्नाकुलमपर्यंत जाणार *अमृतसर- कोचुवेली एक्सप्रेस आठवड्यातून तीनदा. *अमरावती मुंबईदरम्यान आठवड्यातून दोन वेळा गाडी *मछलीपट्टण बंगळूर नवी गाडी आठवड्यातून तीनदा. *वाराणसी रामेश्वरम दरम्यान नवी गाडी *खजुराहो-दिल्लीदरम्यान आठवड्यातून तीनदा गाडी *पुरी ते दरभंगादरम्यान नवी गाडी *इंदूर ते उदयपूरदरम्यान रतलाममार्गे आठवड्यातून तीनदा नवी गाडी *रांची-भागलपूरदरम्यान आठवड्यातून तीनदा नवी गा़ी *चेन्नई-सालेमदरम्यान नवी गाडी *अहमदाबाद पाटण दरम्यान नवी एक्सप्रेस गाडी *इटारसी - कटणीदरम्यान रोज गाडी