तुम्हीच व्हा अर्थमंत्री!

आपल्याला अर्थमंत्री बनण्याची संधी वेबदुनिया देऊ करते आहे. २९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम अर्थसंकल्प मांडणार आहेत. काय स्वस्त होईल आणि काय महाग, कशात सवलत मिळेल आणि कशावर कर लागेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अर्थमंत्र्यांच्या पोतडीत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात ते काय सांगतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. कारण त्यांच्या अर्थसंकल्पावरच तर आपले घरचे 'बजेट' अवलंबून असते.

म्हणूनच तुमच्या भावना अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न वेबदुनिया करते आहे. त्यामुळे या बजेटसंदर्भात तुम्हाला काय वाटते? तुमच्या काय अपेक्षा आहेत? हे सारे सारे मांडण्याची संधी आम्ही तुम्हाला देऊ करतो आहे. त्यामुळे उशीर करू नका आणि तातडीने खाली तुम्हाला काय वाटते ते अगदी निसंदिग्ध शब्दांत लिहा. या विषयावर आपणास स्वतंत्र लेख लिहायचा असल्यास तुम्ही तो मेल [email protected] या पत्त्यावर पाठवू शकता.

संपादक

वेबदुनिया वर वाचा