साडेतीन मुहूर्तांपैकी एक, असा दसऱ्याच्या शुभमुहूर्त गाठून "शिवाई"चा दसरा-दिवाळी अंक वाचकांच्या भेटीसाठी आला आहे. गुढी पाडवा अंकाला मिळालेल्या उत्फूर्त प्रतिसादानंतर यंदा शॉपिजनतर्फे त्यांचा पहिला वहिला दसरा- दिवाळी अंक तयार केला गेला आहे.
या अंकात याच संकल्पनेवर आधारित सुंदर दर्जेदार साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ अनुभवी लेखकांचे साहित्य तर यात आहेच पण यंदा तरुण पीढीचे, नवी उर्जा देणारे विचार देखील आपल्याला या अंकात वाचायला मिळणार आहे. 70 हून जास्त साहित्यिकांचे साहित्य अंकात आहे.
शिवाईच्या या 250 पानी अंकात कविता, कथा, लेख, प्रवास वर्णन, आरोग्य, बालविश्व, मुलाखत, व्यक्तिचित्रे, नाट्यछटा व रेसिपीज असे भरपूर साहित्य आहे. मराठी वाचकांसाठी हा अंक म्हणजे एक पर्वणी आहे. कलावंत सारंग क्षिरसागर ह्यांनी जुन्या व नवीन पिढीतील विचारांचा संगम दर्शविणारं, समर्पक व आकर्षक मुखपृष्ठ अंकासाठी तयार केले आहे.