गरज असल्यास बोल्ड सीन करावे लागतात: कशीश धनोआ

अभिनेत्री कशिश धनोआचे पहिले हिंदी चित्रपट ''एक आदत'' प्रदर्शनास तयार आहे. तेव्हा तिच्याशी मारलेल्या गप्पा :

PR
ऐकण्यात आले आहे की तु आधीपण चित्रपटात काम केले आहे?
हो, या आधी मी तामिळ, तेलुगू, पंजाबी व एका इंग्रेजी चित्रपटात अभिनय केला आहे, पण ''एक आदत'' हे माझे पहिले हिंदी चित्रपट आहे.

पण सर्वात अगोदरतर तू ‘एक आदत’ साइन केली होती?
हे खरं आहे की हे माझे प्रथम चित्रपट आहे, पण काही कारणांमुळे हे रिलीज झाले नाही. या दरम्यान मी तमिळ, तेलुगू, पंजाबी व इंग्रेजी चित्रपटात अभिनय केला.

चित्रपटात तुझी काय भूमिका आहे?
मी सोनिया नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे, तिच्या समोर फार मोठी समस्या येऊन उभी राहते जेव्हा ती एका मुलाशी प्रेम करते पण तिचे शारीरिक संबंध दुसऱ्या मुलासोबत होतात, आणि तिला दोघांनाही धरून ठेवायचे असते.

ऐकण्यात आले आहे की या चित्रपटात तू फार बोल्ड सीन दिले आहे?
हे तर चित्रपट बघितल्यानंतर कळेल. काही सीन्स तर कथेनुसार करावेच लागतात.

अभिनयच्या क्षेत्रात तुझे पर्दापण कसे झाले?
माझा जन्म दिल्लीत झाला आहे आणि माझे शिक्षण मुंबईत झाले आहे. मी कधी कल्पनादेखील केली नव्हती की मी आपले करियर अभिनयच्या क्षेत्रात बनवीन. संयोगाने मी आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या काकांच्या घरी गेले होते, जे आधी रीना रॉयच्या प्रॉडक्शन कंपनीचे मॅनेजर होते. बस तेव्हा पासूनच माझ्या मनात आले की मी सुद्धा अभिनयच्या क्षेत्रात आपले करियर सुरू करू शकते आणि त्यामुळे मी या क्षेत्रात पदार्पण केले.

वेबदुनिया वर वाचा