आणखी एक बायोपिक....

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, अभिनेते आणि फिल्मकार दिवंगत नंदामुरी तारक रामाराव म्हणजे एन.टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला काम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये विद्या ही एन.टी. रामाराव यांची पत्नी बसवतारकम यांची भूमिका साकारणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, एन.टी.आर. पुत्र बालाकृष्णा हे या चित्रपटात पित्याची  भूमिका साकारणार आहेत. 
 
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कृष यच्यावर सोपवण्यात   आली आहे. बाळकृष्णा आणि विष्णुवर्धन इंदुरी हे या चित्रपटाचे  निर्माते आहेत. एन.टी.आर. हे आंध्र प्रदेशचे सातवर्षे मुख्यमंत्रीपदी  होते. राजकारणात येण्यापूर्वी एन.टी.आर. हे स्वतः एक चांगले अभिनेते होते. अभिनय करण्याबरोबरच त्यांनी अनेक चित्रपटांची  निर्मिती, दिग्दर्शन आणि एडिटिंगही केले होते. त्यांनी तीन राष्ट्रीय  चित्रपट पुरस्कार मिळविले होते. याशिवाय ते वैयक्तिक पातळीवरील राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत. 
 
विद्या बालनला बायोपिक्समध्ये काम करण्यास फार आवडते. यापूर्वी तिने 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट वादग्रस्त अभिनेत्री सिल्क स्मितावर आधारित होता. प्रसिद्ध गायिका  ए. एस. सुब्बालक्ष्मी आणि लेखिका कला दास यच्यावर आधारित चित्रपटात काम करण्याची विद्याची इच्छा होती; पण ती पूर्ण होऊ शकली नाही. याशिवाय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या   जीवनावर आधारित वेब सीरिजमध्ये विद्या काम करण्याचे   निश्चित झालचे समजते.
 
स्वाती देसाई 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती