सँनफ्रान्सिसकोमध्ये रंगणार इंडियन अँकेडमी अँवाँर्ड सोहळा

सोमवार, 19 जून 2017 (16:36 IST)
-शाहरूख खान या सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर
भारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकँडमी अँवाँर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सँनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्याभारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकँडमी अँवाँर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सँनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.  शाहरुख खान या पुरस्कार सोहळ्याचा ब्रँड अँबेसेडर आहे. 
 
या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्यं म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडसोबत मराठी आणि टॉलिवूडच्या सिनेमांचाही गौरव करण्यात येणार आहे.  तसेच मराठी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञांनाही गौरवण्यात येणार आहे. हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने भारताची शान उंच करणाऱ्या भारतीय कलाकारांनासुद्धा यावेळी गौरविण्यात येणार आहे. सौरभ पांडे, वंदना कृष्णा हे या पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजक असून प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, अभिनेता सुशांत शेलार  तसेच विन्सन वर्ल्डचे संजय शेटये हे सहप्रायोजक आहेत. 

वेबदुनिया वर वाचा