शेफाली शहा दिग्दर्शीत पहिली फिल्म 'समडे' अधिकृतपणे स्टटगार्ट 2021 च्या 18 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदर्शित!

बुधवार, 16 जून 2021 (21:38 IST)
यावर्षी एप्रिलमध्ये, शेफाली शहा दिग्दर्शित पहिला चित्रपट 'समडे' ऑस्कर प्रमाणित '51 व्या वार्षिक यूएसए फिल्म फेस्टिव्हल'च्या आंतरराष्ट्रीय लघुपट आणि व्हिडिओ स्पर्धेसाठी निवडला गेला होता. बहुमुखी अभिनेत्री लिखित आणि दिग्दर्शित हा लघुपट जर्मनीतील स्टटगार्टच्या 18 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात अधिकृतपणे प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट फिचर फिल्म, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म आणि अ‍ॅनिमेशन प्रकारात दाखवला जाईल.
 
‘समडे’ ही दोन स्त्रियांची कहाणी आहे. त्यांच्यातील नात्याशी संबंधित आहे. विधी, एक फ्रंटलाइन वारियर आहे, जी आजच्या वैद्यकीय स्थितीत अडकली आहे. 15 दिवसांनंतर ती ड्युटीवरून 7 दिवसांच्या विलगीकरणासाठी घरी आली. परंतु, त्याला घर म्हटले जाऊ शकते? जिथे तिच्या आणि तिच्या आईमध्ये फक्त एक अंतर आहे, जे अल्झायमर आहे. ते भूतकाळ आणि भविष्यकाळ याबद्दल बोलतात, ज्यांमध्ये वर्तमानाचा मागमूसही नाही. काही प्रश्न वास्तविक आहेत तर काही काल्पनिक आहेत. त्यांच्यामध्ये जे काही होते, जे असू शकते आणि काय घडू शकते, हे सर्व त्यांच्या नात्याशी संबंधित आहे.
 
युरोपमधील सर्वात मोठ्या भारतीय चित्रपट महोत्सवांपैकी एक असणाऱ्या,  स्टटगार्टचा 18 वा भारतीय चित्रपट महोत्सव 21 ते 25 जुलै 2021 या कालावधीत होत असून मुख्य प्रवाहातील हिंदी प्रॉडक्शन तसेच डॉक्यूमेंटरी, अ‍ॅनिमेशन आणि शॉर्ट फिल्मसह विविध शैली यामध्ये समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त, महोत्सवाच्या आयोजक नवनवीन चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी उत्सुक आहेत. कोविड-19 मुळे, हा चित्रपट महोत्सव ऑनलाईन होणार असून प्रेक्षकांना व्हर्च्युअल उत्सवाचा अनुभव देईल. ऑनलाईन उद्घाटन व पुरस्कार सोहळ्याशिवाय चित्रपटांचे ऑनलाईन स्क्रीनिंगसह प्रश्नोत्तर आणि चित्रपट चर्चेचे सहाय्यक कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात येतील.
 
या विषयी बोलताना शेफाली शाह म्हणाली की, “जगात पोहोचलेल्या स्टटगार्टच्या 18 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात 'समडे' रिलीज होणार असल्याच्या बातमीने मी किती उत्साही झाले आहे याचे मी शब्दात वर्णन करु शकत नाही. हा एक मोठा सन्मान आहे. जगभरातील चित्रपट महोत्सवांसाठी माझा हा चित्रपट पाठवण्याचा निर्णय योग्य होता,  नवोदित दिग्दर्शक म्हणून माझा स्टँड तपासून पाहण्याची ही संधी होती. त्यामुळेच या प्रतिष्ठित महोत्सवात निवड होणे, हे खूपच आश्वासक आहे."
 
गेल्या वर्षी अभिनेत्री 'दिल्ली क्राइम' या वेब शोद्वारे आंतरराष्ट्रीय एम्मी अवॉर्ड्समधील सर्वोत्कृष्ट ड्रामा  सिरीजचा पुरस्कार जिंकण्याबरोबरच प्रतिष्ठित जागरण फिल्म फेस्टिव्हल, आयरील अवॉर्ड्स आणि एशियन अ‍ॅकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स (सिंगापूर) येथे समीक्षकांनी गौरवलेला शोसाठी शेफाली शाहने गेल्या वर्षी तीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कारही जिंकले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती