सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफची मुलगी या सिनेमातून पदार्पण करते आहे. हा सिनेमा ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. केदारनाथ ही एक प्रेमकहाणी आहे. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये जो महापूर आला त्याचाही संदर्भ या प्रेमकथेला असणार आहे.