बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय तो त्याच्या जुहूच्या बंगल्यासाठीही चर्चेत आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की सनी देओल हा बँकेचा कर्जदार आहे आणि त्यामुळे बँक त्याचा एक व्हिला विकण्याच्या तयारीत आहे. पण आता सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदाने आज एका निवेदनात म्हटले आहे की अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या मुंबईतील जुहू बंगल्यासाठी लिलावाची नोटीस मागे घेण्यात आली आहे. सनी देओलसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने मुंबईतील जुहू येथील अभिनेत्याच्या बंगल्याचा लिलाव करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
तांत्रिक बिघाडामुळे लिलाव थांबवण्यात आल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. अशाप्रकारे, 56 कोटी रुपयांची थकबाकी दिल्यानंतर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा 24 तासांत लिलाव करण्याचा निर्णय मागे घेतला आहे .
याआधी, शनिवारी, 19 ऑगस्ट रोजी एका बँकेच्या जाहिरातीतून असे दिसून आले की अभिनेता सनी देओलचा चित्रपट गदर-2 या दिवसात बॉक्स ऑफिसवर दररोज कोटींची कमाई करत आहे, परंतु त्याचा जुहू येथील सनी व्हिला बंगला लिलाव होणार आहे. सनीने हा बंगला गहाण ठेवून कर्ज घेतले होते, जे तो फेडू शकला नाही.